पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आठ वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. मात्र, याप्रकरणी अजूनही आरोपींना शिक्षा झाली नाही. पुण्यातील विशेष न्यायालयात या खटल्याचे कामकाज सुरू आहे. यातील आरोपींवर आज दोषारोपपत्र सादर करण्यात येणार होते. मात्र, यातील आरोपींनी वकील आणि कुटुंबीयांना भेटू देण्याची विनंती केली होती. त्यानंतर न्यायालयाने ही विनंती मान्य केली. त्यानंतर आता येत्या 15 सप्टेंबर रोजी आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. पुणे न्यायालयात याप्रकरणी आज (मंगळवारी) सुनावणी पार पडली.
आज पार पडलेल्या सुनावणीसाठी आरोपी सचिन अंदुरे, वीरेंद्रसिंह तावडे, एडवोकेट संजीव पुनाळेकर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. आरोपी विक्रम भावे प्रत्यक्ष उपस्थित होता. तर आरोपी शरद कळसकर हा न्यायालयासमोर अनुपस्थित होता. बचाव पक्षातर्फे वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी कामकाज पाहिले तर सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी सरकारची बाजू न्यायालयात मांडली.
हेही वाचा -अखेर परमबीर सिंह यांच्याविरोधात अटक वारंट जारी; चांदीवाल आयोगाचा निर्णय