बारामती -शेताच्या बांधावरचे गवत आणल्याच्या कारणावरून तिघांना खोऱ्याने व लाकडी काठीने मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. इंदापूर तालुक्यातल्या लासुर्णे येथील तिघांना मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी रमेश धायगुडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र वसंत धायगुडे, अनिल वसंत धायगुडे, सुजाता राजेंद्र धायगुडे व योगिता अनिल धायगुडे सर्व रा. लासुर्णे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
शेताच्या बांधावरचे गवत आणल्याच्या कारणातून तिघांना मारहाण, गुन्हा दाखल - बारामती क्राईम न्यूज
शेताच्या बांधावरचे गवत आणल्याच्या कारणावरून तिघांना खोऱ्याने व लाकडी काठीने मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. इंदापूर तालुक्यातल्या लासुर्णे येथील तिघांना मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी रमेश धायगुडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाण प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल
घटनेबाबत अधिक माहिती अशी, की २३ नोव्हेंबर रोजी शेताच्या बांधावरून गवत आणल्याच्या कारणावरून आरोपी व रमेश धायगुडे यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी समेश धायगुडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला मारहाण केली. याप्रकरणी रमेश धायगुडे यांच्या तक्रारीवरून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.