महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 20, 2020, 7:33 AM IST

ETV Bharat / state

कोरोना : पिंपरी-चिंचवडमध्ये आदेश न पाळण्याऱ्या १०२ जणांवर गुन्हे दाखल

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, अनेकांनी हे आदेश मानले नसून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.

कोरोना
कोरोना

पुणे - अत्यावश्यक सेवा वगळून दुकाने सुरू ठेवणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील ऐकूण १०२ जनांवर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी केवळ पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील असून आकडे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वाधिक चिखली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत २३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये आदेश न पाळण्याऱ्या १०२ जणांवर गुन्हे दाखल

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, अनेकांनी हे आदेश मानले नसून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि भोसरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात आत्तापर्यंत १९ रुग्ण आढळले आहेत.

कोणत्या पोलीस ठाण्यांतर्गत किती गुन्हे दाखल ते खालील प्रमाणे -

चिंचवड पोलीस ठाणे - ०४, चिखली पोलीस ठाणे-२३, सांगवी पोलीस ठाणे- २०, देहूरोड पोलीस ठाणे- २०, भोसरी एमआयडीसी- ०६, भोसरी पोलीस ठाणे- ०२, निगडी पोलीस ठाणे- ०६, आळंदी पोलीस ठाणे- ०२, दिघी पोलीस ठाणे- ०२, हिंजवडी पोलीस ठाणे- ०७, शिरगाव पोलीस चौकी- ०१, रावेत पोलीस चौकी-०२, म्हाळुंगे पोलीस चौकी- ०१, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे- ०६ असे एकूण १०२ जनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा -पुण्यात सोशल डिस्टंन्सिंग नियम होणार काठोर; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details