महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे-सातारा मार्गावर ग्रामीण पोलिसांनी जप्त केले लाखो रुपये किंमतीचे चरस - पुणे ग्रामीण पोलीस

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या लक्झरी बसमधून एक इसम चरसची वाहतूक करत असल्याची माहिती राजगडचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार राजगड पोलिसांनी शुक्रवारी पहाटे खेड-शिवापूर टोल नाक्यावर सापळा रचला होता.

चरस तस्करी पुणे
चरस तस्करी पुणे

By

Published : Oct 8, 2021, 5:00 PM IST

Updated : Oct 8, 2021, 5:11 PM IST

पुणे - राजगड पोलिसांनी पुणे-सातारा महामार्गावर खेड शिवापूर येथे मुंबईहून गोव्याला निघालेल्या लक्झरी बसमधून शुक्रवारी पहाटे सुमारे बत्तीस लाख रुपये किमतीचे सहा किलो चरस कारवाई करत जप्त केला आहे. याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली.

32 लाखांचे चरस

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या लक्झरी बसमधून एक इसम चरसची वाहतूक करत असल्याची माहिती राजगडचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार राजगड पोलिसांनी शुक्रवारी पहाटे खेड-शिवापूर टोल नाक्यावर सापळा रचला होता. पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास टोल नाक्यावर एक संशयित लक्झरी बस बाजूला घेऊन तपासणी केली असता त्यातील धुनिया याच्याकडे चरस आढळून आला. त्याच्याकडून सुमारे बत्तीस लाख रुपये किमतीचे एकूण सहा किलो चरस जप्त करण्यात आले आहे.

गुन्हा दाखल

याप्रकरणी धुनिया याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक मनोज अवसरे, फौजदार श्रीकांत जोशी, निखिल मगदूम, पोलीस हवालदार संतोष तोडकर, सोमनाथ जाधव, पी. एस. निकम, अजित माने, भगीरथ घुले, नाना मदने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

चरसचे नेपाळ, पाकिस्तान कनेक्शन

इतक्या मोठ्या प्रमाणात चरसचा साठा सापडल्याने पोलिसांनी या आरोपीची कसून चौकशी केली असता हा काही आंतरराष्ट्रीय तस्करांच्या संपर्कात असल्याचे समोर आले. त्या टोळीचा हा म्होरक्या असून, नेपाळमार्गे बिहार आणि तेथून मुंबईत ड्रग्ज आणत असल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. पटनाजवळील नेपाळच्या सीमेवरून हे चरस भारतात आणले जात असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार तस्करांची साखळी शोधण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. हे चरस पाकिस्तानातून आले असावे, असेही म्हटले जात आहे.

Last Updated : Oct 8, 2021, 5:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details