महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Twine Chappal : पुण्यातील 'या' पठ्ठ्याने बनवली सुतळीपासून चप्पल, वाचा सविस्तर - Twine Chappal

पुण्यातील सिंचन भवन येथे सुरू असलेल्या भीमथडी जत्रेमध्ये ( Bhimthadi fair in Pune ) सुतळीपासून बनवलेल्या चप्पलची ( Chappal made from twine ) चर्चा मोठ्या प्रमाणात करताना पाहायला मिळत आहे. बारामतीत राहणाऱ्या योगेश बनकर ( Chappal made from twine by Yogesh Bankar ) या तरुणाने 2019 साली सुतळीपासून चप्पल बनविण्याचा प्रयोग केला. हा प्रयोग करत असताना त्याला खूप मेहेनत घ्यावी लागली. 2019 साली जेव्हा योगेश बाहेर गेला तेव्हा त्याने अशाच प्रकारची एक चप्पल बघितली आणि तशीच त्याप्रमाणे ती चप्पल बनवायचे ठरवले.

Twine Slippers
सुतळीपासून बनवलेली चप्पल

By

Published : Dec 24, 2022, 5:23 PM IST

सुतळीपासून बनवलेली चप्पलची माहिती देताना तरूण योगेश बनकर

पुणे : आजपर्यंत आपण विविध कंपन्यांचे तसेच विविध डिझाईनमध्ये आकर्षक अस चप्पल पाहिले आहेत. तसेच कोल्हापुरी चप्पल देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. सध्या आकर्षक स्वप्न आणि कंपनीच्या ब्रँड असलेल्या चपलीमध्ये सुतळीपासून बनवलेली चप्पल ( Twine Chappal ) चर्चेचा विषय ठरत आहे. पुण्यातील सिंचन भवन येथे सुरू असलेल्या भीमथडी जत्रेमध्ये ( Bhimthadi fair in Pune ) सुतळी पासून बनवलेल्या चप्पलची चर्चा मोठ्या प्रमाणात करताना पाहायला मिळत आहे.


अशी बनविली चप्पल : बारामतीत राहणाऱ्या योगेश बनकर ( Chappal made from twine by Yogesh Bankar ) या तरुणांनी 2019 साली सुतळी पासून चप्पल बनविण्याचा प्रयोग केला. हा प्रयोग करत असताना त्याला खूप मेहेनत घ्यावी लागली. 2019 साली जेव्हा योगेश बाहेर गेला तेव्हा त्याने अशाच प्रकारची एक चप्पल बघितली आणि ठरवली की आत्ता अशीच चप्पल आपल्याला बनवायची आहे. आणि त्याने चर्मकार समाजाचा एक मित्र आहे. त्याला अशीच सुतळी पासून चप्पल बनिविण्याचे सांगितले. पण त्याला जी वेणी घालायची आहे तीच आम्हाला जमत नव्हती. पण आम्ही जिद्द केली होती की अशीच सुतळीपासून चप्पल बनवायची आणि ती बाजारात आणायची आहे.

सुतळीपासून बनवलेली चप्पल


मोठा प्रतिसाद : काही दिवस सुतळीवर अभ्यास करून आम्ही ती वेणी बनवण्याचा शिकलो आणि त्यानंतर आता त्याच्यात बेलवेट लावून रबर सोल लावून आम्ही ती चप्पल बनविली. आणि प्रथमच डिसेंबर 2019 साली आम्ही पुण्यात आयोजित भीमथडी मध्ये ती चप्पल आणली आम्हाला वाटलं नव्हतं की या चप्पल ला आपल्याला सुरुवातीला इतका प्रतिसाद मिळेल. पण जेव्हा ती चप्पल आम्ही भीमथडी जत्रेत आणली तेव्हा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या चपलेला पसंती दिली. मोठ्या प्रमाणत खरेदी देखील केली. पण त्यानंतर कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्यात आला आणि तेव्हा काहीच करता आले नाही. आत्ता आम्ही बारामती मध्येच सुतळी पासून ही चप्पल बनवत आहोत, असे यावेळी योगेश बनकर याने सांगितले.


चप्पलला दिले विशेष नाव : योगेशने या चप्पल ला नाव देखील दिलं असून याच नाव चापीटो अस दिलं आहे. याच अर्थ असा की हा मलेशियन भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ गॉड गिफ्ट असा आहे आणि तेच नाव मी या सुतळी पासून बनविलेल्या चप्पलला दिले, असे देखील यावेळी बनकर याने सांगितले आहे. मला या चप्पलचा ब्रँड करायचा आहे आणि आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ते मी करणार देखील आहे. फक्त पुणे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर तसेच जयपूर येथे देखील या चप्पलला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे यावेळी योगेश यांने सांगितले.

सुतळीपासून बनवलेली चप्पल

चप्पल बनवण्याची पद्धत : नारळाच्या केसरा पासुन सुतळी तयार करून वेनीचे बेल्ट तयार करतो व त्यास नैसर्गिक रंग दिला जातो. सुती वेलवेट कापडाचे आवरण व रबर सोलस्पंज वर लाऊन तयार करतात. नैसर्गिक झाडाचे रबर पासुन बनवलेले सोल लावले जाते.


फायदे : योगेशने यावेळी चप्पल वापराचे फायदे देखील सांगितले. तो म्हणाला की, उष्णता सर्दी मधुमेह वापरण्यास अत्यंत चांगली आहे. चप्पल अत्यंत टिकाऊ व वजनाला हलकी आहे. तरुण व वयस्कर व्यक्तींना वापरण्यास योग्य असल्याचे त्याने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details