बारामती-‘गाव करील ते राव काय करील’ या लोकप्रिय प्रचलित म्हणीचा प्रत्यय बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडीत येत आहे. सायंबाचीवाडी हे गाव नेहमीच दुष्काळग्रस्त म्हणून ओळखले जाते. मात्र, याच सायंबाच्यावाडीत निर्माण केलेल्या पाझर तलावात आता बोटींग करण्याइतपत पाणी भरले आहे. गावात जलसंधारणाची झालेली कामे आणि वरुणराजाने भरभरून दिलेल्या दानामुळे वाडी आता पाणीदार झाली आहे.
एकेकाळी दुष्काळाचा सामना केलेल्या बारामतीच्या 'सायंबाचीवाडी'त आता चालते बोटींग पाणी फाउंडेशनच्या जल साक्षर चळवळीत प्रवेश
बारामती तालुक्याच्या जिरायती पट्ट्यात येणारी सायंबाचीवाडीत कायमच दुष्काळ असल्यामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. एक हंडा पाण्यासाठी गावातील लोकांना पायपीट करत जावे लागत होते. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांच्या डोक्यावरील हंडा कधी उतरलाच नव्हता. मात्र, पाण्याचा भेडसावणारा प्रश्न सोडविण्यासाठी २०१८-१९ मध्ये सायंबाचीवाडी एक जुटीने पाणी फाऊंडेशनच्या जल साक्षर चळवळीमध्ये उतरली आणि गावाचे रूपच पालटले.
एकेकाळी दुष्काळाचा सामना केलेल्या बारामतीच्या 'सायंबाचीवाडी'त आता चालते बोटींग पाणी फांउडेशन स्पर्धेत तालुक्यात प्रथम
पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गावाच्या मध्यभागी असणाऱ्या लेंडी पिंपरी या सर्वात मोठ्या तलावातील गाळ काढण्यात आला. २०१९ मध्ये मुबलक प्रमाणात पाऊस झाल्यामुळे ग्रामस्थ आणि पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून माळरानावर पाझर चाऱ्या तयार करण्यात आल्या. ग्रामस्थांच्या या प्रयत्नांना यश मिळाले. पाणी फांउडेशनच्या स्पर्धेत सायंबाच्यावाडीने बारामती तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकवला. मात्र, जिल्हा पातळीवरील पहिल्या क्रमांकांचे बक्षिक गमवावे लागले.
एकेकाळी दुष्काळाचा सामना केलेल्या बारामतीच्या 'सायंबाचीवाडी'त आता चालते बोटींग शेकडो एकर शेती ओलीताखाली....
२०२० साली संपूर्ण जिल्ह्यामध्ये अक्षरश: ढगफुटी सारखा पाऊस झाला. सायंबाच्यावाडीत ही पावसाने आजवरचे सगळे विक्रम मोडले. लेंडी पिंपरी पाझर तलाव व गावाच्या भोवती असणारे ४ ते ५ तलाव भरून वाहू लागले. जलंसाधारणाच्या कामामुळेआज पाझर तलावाच्या भोवतालची शेकडो एकर शेती ओलिताखाली आली आहे.
एकेकाळी दुष्काळाचा सामना केलेल्या बारामतीच्या 'सायंबाचीवाडी'त आता चालते बोटींग लेंडी पिंपरी तलाव बनला पर्यटन स्थळ ...
शहरामध्ये नागरिकांना फिरायला, मुलांना खेळायला बाग, उद्याने असतात. मात्र, ग्रामीण भागात विरंगुळ्यासाठी ग्रामस्थांना हक्काचे ठिकाण नसते. त्यामुळे गावच्या मध्यभागी असणाऱ्या तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले. तलावाच्या भराव्यावर ४०० मिटर लांबीचे दोन ‘मॉर्निंग.वॉक ट्रॅक’ तयार करण्यात आले. एवढेच नाही तर जिल्हा परिषदेकडून विशेष निधी अंतर्गत तलावात विहार करण्यासाठी बोटही उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती सरपंच प्रमोद जगताप यांनी दिली.
एकेकाळी दुष्काळाचा सामना केलेल्या बारामतीच्या 'सायंबाचीवाडी'त आता चालते बोटींग गावाच्या उत्पन्नात भर-
ग्रामपंचायतीला देखील यातून उत्पन्न मिळावे यासाठी गावाच्या भोवती असणाऱ्या चार ते पाच पाझर तलावांच्या भोवती बांबूच्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे. तसेच लेंडी पिंपरी तलावाच्या परिसरात प्ले ग्रांऊड तयार करण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला देण्यात आला आहे. तसेच युवकांसाठी ओपन जीम देखील उभारण्यात येणार आहे.
हेही वाचा-...त्यावर शरद पवार कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत - देवेंद्र फडणवीस
हेही वाचा-चीनच्या सीमेवर कर्तव्य बजावताना निलंग्यातील जवानाला वीरमरण