पुणे - राज्यभर सध्या गणेशोत्सवाची धूम आहे. गणरायांच्या दर्शनासह वैविध्यपूर्ण देखावे पाहण्यासाठी भाविकांची गणेश मंडळामध्ये सध्या गर्दी बघायला मिळत आहे. 'चांद्रयान २' चे यशस्वी प्रक्षेपण करत भारताने इतिहास रचला. याच घटनेची प्रतिकृती तुळशी बागेतील गजानन मित्र मंडळाने साकारली आहे.
'चांद्रयान २' मोहिमेचा देखावा हेही वाचा - Chandrayaan-2 : 'चांद्रयान 2'चा खर्च एका भारतीयाच्या मागे एका वडापावाएवढा!
तर दुसरीकडे पुण्यातील साने गुरुजी मित्र मंडळाच्यावतीने अयोध्येतील प्रस्तावित राम मंदिराच्या प्रतिकृतीची निर्मिती करण्यात आली आहे. छत्रपती राजाराम मंडळाने साकारलेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठीही भाविकांनी गर्दी केली आहे.
हेही वाचा - शिवडीचा राजा गणपतीचा 'कलम 370 रद्द'वर 'नंदनवनात स्वातंत्र्याची पहाट' देखावा
श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून २२ जुलैला भारताच्या 'चांद्रयान-२'चे प्रक्षेपण झाले. हे यान ७ सप्टेंबरला पहाटे चंद्रावर उतरणार आहे.