महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Madgulkar memorial : ग. दि. माडगूळकर स्मारकाचे काम वर्षात पूर्ण करा - चंद्रकातदादा पाटील - should be completed in year

महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेले थोर साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाचे (Madgulkar memorial) काम एका वर्षात पूर्ण (should be completed in year) करावे, त्यासाठी येत्या आठवड्यात निविदा प्रकिया सुरु करावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकातदादा (Chandrakatdada Patil) पाटील यांनी दिले.

Chandrakatdada Patil
चंद्रकातदादा पाटील

By

Published : Jan 4, 2023, 4:02 PM IST

पुणे : पालकमंत्री चंद्रकातदादा (Chandrakatdada Patil) पाटील यांनी ग. दि. माडगळूकर (Ga Di Madgulkar) यांच्या नियोजित स्मारकाला भेट देवून अधिकाऱ्यांकडून स्मारकाच्या कामाबाबत माहिती घेतली. यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त (विशेष) आयुक्त विकास ढाकणे, अधीक्षक अभियंता हर्षदा शिंदे उपस्थित होते.


स्मारकाचे काम पुढील वर्षाच्या गुढी पाडव्यापर्यंत करावे : यावेळी चंद्रकातदादा (Chandrakantdada Patil) पाटील म्हणाले की, गदिमा स्मारकाच्या मूळ इमारतीचे काम आधी पूर्ण करणे आवश्यक आहे. सुरु असलेल्या प्रदर्शन केंद्राच्या कामासोबत स्मारकाचे (Madgulkar memorial) कामही सुरु करावे आणि पुढील वर्षाच्या (should be completed in year) गुढी पाडव्यापर्यंत ते पूर्ण करावे. कामासाठी चांगली क्षमता असलेल्या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात यावी.


गदिमांच्या कुटुंबियांशी चर्चा करावी : काम पूर्ण करण्यासाठी त्याला प्रोत्साहनात्मक सुविधा देण्यात याव्यात. स्मारकाच्या आतील सजावटीचा आराखडा तयार करताना गदिमांच्या कुटुंबियांशी चर्चा करावी व पुढील आठवड्यात त्याचे सादरीकरण करण्यात यावे. गदिमांच्या कार्याला साजेसे असे स्मारक उभे राहील याकडे विशेष लक्ष (Madgulkar memorial should be completed in year) द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.



तीन मजली भव्य स्मारक उभारण्यात येणार : यावेळी ढाकणे यांनी स्मारकाच्या कामाबाबत माहिती दिली. कोथरुड मध्ये तीन मजली भव्य स्मारक उभारण्यात येणार असून बांधकामाचे क्षेत्रफळ ३ हजार २३०.७८ चौरस मीटर एवढे असणार आहे. पहिल्या आणि तिसऱ्या मजल्यावर पाच विविध दालने आणि दुसऱ्या मजल्यावर प्रायोजित रंगभूमीसाठी नाट्यगृह नियोजित आहे. एक्झिबिशन सेंटरच्या स्वंतत्र इमारतीचे क्षेत्रफळ ८ हजार ५८०.३२ चौरस मीटर असून त्याचे काम सुरु करण्यात आले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

गदिमांबद्दल : गदिमांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ ला सांगली जिल्ह्यातील शेटफळे या गावी झाला. माडगूळरांचे बालपण माडगुळे या गावी गेले. त्यांचे वडील औंध संस्थानात कारकून होते. शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे झाले. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरीबीमुळे चरितार्थासाठी चित्रपटव्यवसायात आले. त्यांना लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती.

चित्रपटांसाठी काम करण्यास सुरुवात केली : गदिमांनी दहावीत नापास झाल्यानंतर चित्रपटांसाठी काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी ब्रम्हचारी (१९३८), ब्रॅंडीची बाटली (१९३९) या सारख्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका साकारल्या. १९४२ मध्ये आलेल्या नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी, पहिला पाळणा या चित्रपटांसाठी त्यांना प्रथम गीतलेखनाची संधी मिळाली. १९४७ साली आलेल्या राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामशेजी चित्रपटापासून त्यांना कथा, पटकथा, गीते यासाठी चांगलीच ओळख मिळाली, त्यात एक भूमिकाही त्यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details