पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत जिल्ह्याला पालकमंत्री नसून जिल्ह्यात विकासाची कामे होत नसल्याची टीका केली आहे. यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिउत्तर देत जो झोपलेला आहे त्याला उठवण खूप सोप्प असत पण ज्याने झोपेचं सोंग घेतल आहे.त्याला उठवण खूप अवघड असते. अस म्हणत सुळे यांना टोला लगावला ( Chandrakant Patil reaction Supriya Sule statment ) आहे. पुण्यातील डीपी रोड येथील आयोजित रक्तदान शिबिराला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली यावेळी ते बोलत ( Chandrakant Patil Visit Blood Donation Camp ) होते.
पवार कुटुंबीयांना चिमटा काढण्याची सवय :शासकीय कार्यक्रम आमच्या पूर्वपरवानगी शिवाय करू नये. असे पत्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले आहे. यावर अजित पवार यांनी टीका केली ( Chandrakant Patil criticize Ajit Pawar ) आहे. याबाबत पाटील यांना विचारले असता. त्यांनी त्यांच्या पालकमंत्री काळातील अनुभव पहावे. तसेच आम्ही आमच्या घरचे पैसे खर्च करून खूप सामाजिक काम ही करत असतो. सार्वजनिक पैसा हा सार्वजनिक असल्याने त्याच योग्य नियोजन व्हावे यासाठी हा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांना टिका केल्या शिवाय मोठेपणा येत नाही. आणि पवार कुटुंबीय सारखे माझे चिमटा काढण्याचे प्रयत्न करत ( Pawar family has pinching habit ) असतात. आणि मी ते एन्जॉय करतोय अस देखील यावेळी पाटील म्हणाले.