पुणे - ''भाजप पक्ष सर्वांना न्याय देते, देर है लेकीन अंधेर नही'' असे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या उमेदवारी वर भाष्य केले आहे. भाजपच्या उमेदवारांच्या याद्या अजून येत आहेत. मला अनेक जण भेटले त्यात रक्षा खडसे यांचा ही समवेश होता. असे चंद्रकांत पाटील म्हणाले, ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
चंद्रकांत पाटीलांचे खडसेंच्या उमेदवारीवर मोठे विधान म्हणाले, भाजप सगळ्यांना न्याय देते हे ही वाचा -'षडयंत्र रचणाऱ्याला खडसेंनी समोर आणावेच'
दरम्यान, भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादीही प्रसिद्ध झाली असून त्यातही एकनाथ खडसे, विनोद तावडे यांची नावे नाहीत. मात्र, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सगळ्यांना न्याय मिळेल असे सांगत आहेत. पुण्यातल्या कोथरूड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत असलेले चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी कार्यकर्ता मेळावा घेत इच्छुकांची नाराजी मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कोथरूडच्या नाराज आमदार मेधा कुलकर्णी यांच्या घरी देखील भेट दिली. चंद्रकांत पाटील गुरुवारी सकाळी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
हे ही वाचा -दुसऱ्या यादीतही एकनाथ खडसेंना ठेंगा; पत्ता कापल्याचे निश्चित?