पुणे- दगा फटका झाला नसता तर देवेंद्र फडणवीस यांनी वसंतराव नाईक यांच्या सर्वाधिक काळ मुख्यमंत्री या विक्रमाची बरोबरी केली असती, अशी खंत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या गौरव समारंभात ते बोलत होते.
महापौर मोहोळ यांचा सर्व पक्षीय गौरव समारंभ... हेही वाचा-सत्य बाहेर येईल म्हणूनच पवारांचा 'एनआयएला' विरोध - फडणवीस
महापौर मोहोळ यांचा सर्व पक्षीय गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपसह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या नेत्यांची उपस्थिती होती.
यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, दक्षिणे आणि उत्तरेकडच्या राजकीय पक्षाच्या नेत्यामध्ये सुसंवाद दिसून येत नाही. मात्र, महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेत्यांमध्ये संवाद पाहायला मिळतो. काय बोलू नये हे राजकारणात महत्वाचे असते. मात्र, नेत्यांनी माध्यमांशी कधी बोलू नये हेही आता शिकले पाहिजे.