महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मतदानाच्या दिवशी चंद्रकांत पाटलांची विरोधी उमेदवाराला 'ऑफर' - कोथरूडमधील भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील

आज चंद्राकांत पाटील आणि किशोर शिंदे यांची मयूर कॉलनी येथील जोग शाळा केंद्रावर भेट झाली. यावेळी दोघेही समोरासमोर आले असताना पाटील यांनी विनोदामध्ये शिंदेंना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. मात्र, शिंदेंनी ती ऑफर तोंडावर धुडकावली

चंद्रकांत पाटील आणि किशोर शिंदे

By

Published : Oct 21, 2019, 3:49 PM IST

पुणे -कोथरुड विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्याच विरोधातील मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पक्षामध्ये येण्याची ऑफर केली आहे. मात्र, शिंदेंनी त्यांची ऑफर तोंडावर धुडकावली. त्यामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.

मतदानाच्या दिवशी चंद्रकांत पाटलांची प्रतिस्पर्धी उमेदवाराला भाजपमध्ये येण्याची ऑफर

कोथरुड विधानसभा मतदारसंघात लक्षवेधी लढत आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज चंद्रकांत पाटील आणि किशोर शिंदे यांची मयूर कॉलनी येथील जोग शाळा केंद्रावर भेट झाली. यावेळी दोघेही समोरासमोर आले असताना पाटील यांनी विनोदामध्ये शिंदेंना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. मात्र, शिंदेंनी ती ऑफर तोंडावर धुडकावली. यावेळी दोघांमध्ये भाजप प्रवेशावरुन हास्यविनोद झाल्याचे पाहायला मिळाले.

ABOUT THE AUTHOR

...view details