पुणे - राज ठाकरे यांना मी प्रगल्भ समजत होतो. मात्र, ते शरद पवार जी लाईन देतात तिला घेऊन बोलत आहेत. अजित पवारांनी मला चंपा म्हटले लगेच राज ठाकरे यांनी मला चंपा म्हटले त्याचा मला राग नाही. मात्र, एवढा प्रगल्भ नेता अजित पवारांनी चंपा म्हटल्यावर राज ठाकरे यांनी दुसरे काही तरी मला म्हणायला हवे होते, अशी कोपरखळी मारत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली.
'पवारांनी चंपा म्हणल्यावर राज ठाकरेंनी काहीतरी नवीन म्हणावं' - ajit pawar in pune
अजित पवारांनी चंपा म्हटल्यावर राज ठाकरे यांनी दुसरे काही तरी मला म्हणायला हवे होते, अशी कोपरखळी मारत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली.
आम्ही बोललो तर महागात पडेल हे विरोधकांनी विसरू नये. प्रचाराची पातळी किती खालच्या पातळीवर नेले. मात्र, मी तसे करणार नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. गुरुवारी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधकांकडे टीका करायला विरोध करायला मुद्दाच नाही. त्यामुळे ते खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. राज्यभरात महायुतीच्या कमीत कमी 220 जागा निवडून येणार आहेत. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राज ठाकरे चांगले व्यक्ती आहेत. पण, शरद पवार सांगेल ते बोलतात असा टोला पाटील यांनी लगावला.
हेही वाचा - 'म्हशीपेक्षा रेडकू मोठं कसं?' शिखर बँकप्रकरणी अजित पवारांची भाजपवर टीका