पुणे- "अरे वा... जूनं झालं तरी ते खोटं आहे! अजित पवार यांनी माझी चेष्ठा करण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी त्यांना प्रश्न विचारला की 54 जणांची यादी पवार साहेबांच्या ड्राव्हरमधून चोरून भाजपाकडे देणे हे महाराष्ट्राच्या नैतिकतेत बसत का? आणि तुम्ही मला शहाणपणा शिकवताय. मी झोपत सरकार पडेल असे म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया दिली म्हणून वाराला प्रतिवार करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. म्हणून मी ते करेल" अशी टिका चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली आहे. नगरसेविका वासंती जाधव यांच्यावतीने रिक्षाचालकांना आणि सलून व्यवसायिकांना अन्न धान्य किटचे वाटप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
'रिव्ह्यू पिटीशन दाखल करण्यात उशीर का?' -
मराठा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीची भावना आहे की, महाविकास आघाडी सरकारने सुप्रीम कोर्टात केस नीट चालवली नाही. सुप्रीम कोर्टाच्या 600 पानात याचा ठाहीठाही उल्लेख आहे. तरी अजित पवार यांना वाटत असेल की त्यांनी खूप मेहनत घेतली आहे तर अडचण नाही. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यापासून मी म्हणतोय, तुम्ही रिव्ह्यू पिटीशन दाखल केली पाहिजे. हे कश्यासाठी उशीर करत आहे. जरी 102 व्या घटना दुरुस्थित राज्याचे अधिकार गेले तरीही केंद्राने सुरुवात होत नाही तर ते राज्याने सुरुवात होते. त्यामुळे मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून तो अहवाल राष्ट्रपतीकडे पाठवल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही, असे यावेळी पाटील म्हणाले.