पुणे- केवळ पुण्यात नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात सुरु केलेली दारुविक्री ही घातक आहे. नागरिकांनी रस्त्यावर मोठया रांगा लावल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंग अजिबात पाळले जात नाही. त्यामुळे मुंबई, पुणे हॉटस्पॉट असताना येथे व संपूर्ण महाराष्ट्रात दारुची दुकाने उघडी ठेऊ नयेत, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई, पुण्यातील दारुविक्रीबाबत चद्रकांत पाटलांचे मोठं वक्तव्य, म्हणाले...
दारु विक्रीतून मिळणारे उत्पन्न वगैरे गोष्टी बाजूला ठेऊन सामाजिक अडचणी लक्षात घेता, हे बंद करायला हवे. दारु ही जीवनावश्यक गोष्ट नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
यावेळी पाटील म्हणाले, सध्या सगळेजण घरामध्ये एकत्र असल्याने यापूर्वीच अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यात दारुच्या बाटल्या घरात आल्या की आणखी अडचणी निर्माण होत आहेत. दारु विक्रीतून मिळणारे उत्पन्न वगैरे गोष्टी बाजूला ठेऊन सामाजिक अडचणी लक्षात घेता, हे बंद करायला हवे. दारु ही जीवनावश्यक गोष्ट नाही.
नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने मित्र परिवारतर्फे बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर संस्थेच्या प्रांगणातून कोरोना लढाईत प्रत्यक्ष काम करणाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या व पुण्यातील 1 हजार गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकत्यांसह पोलीस, डॉक्टर्स, पत्रकार असे 3 हजार जणांना जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन कार्यकर्ता सन्मान करण्यात आला. यावेळी प्रादेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उप महापौर सरस्वती शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.