पुणे- एकनाथ खडसेंना पक्षाने आजवर सात वेळा विधानसभा सदस्य, दोन वेळा मंत्रीपद, विरोधीपक्षनेतेपद, सुनेला खासदारकी, मुलीला जिल्हा बँकेचे चेअरमनपद, बायकोला महानंदाचे चेअरमनपद असे खूप काही दिले. हरिभाऊ जावळे यांची उमेदवारी रद्द करुन त्यांनी सुनेला खासदारकीची उमेदवारी दिली. त्यामुळे पाठीत खंजीर खुपसल्याची भाषा त्यांनी करू नये, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
'पाठीत खंजीर खुपसल्याची भाषा नाथाभाऊंनी करू नये, यामुळे कटुता वाढेल' - चंद्रकांत पाटील बातमी पुणे
हरिभाऊ जावळे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली असतानाही एकनाथ खडसे यांनी त्यांची उमेदवारी रद्द करायला लावून स्वतःच्या सुनेला उमेदवारी दिली. जगवाणी विधानसभेचे आमदार असताना खडसे यांनी त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली. त्यामुळे खडसेंनी खंजीर खुपसण्याची भाषा करू नये. यामुळे कटुता वाढेल.
chandrakant-patil-comment-on-eknath-khadse
हरिभाऊ जावळे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली असतानाही एकनाथ खडसे यांनी त्यांची उमेदवारी रद्द करायला लावून स्वतःच्या सुनेला उमेदवारी दिली. जगवाणी विधानसभेचे आमदार असताना खडसे यांनी त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली. त्यामुळे खडसेंनी खंजीर खुपसण्याची भाषा करू नये. यामुळे कटुता वाढेल. माध्यमांसमोर जाऊन अशाप्रकारची भाषा करणे योग्य नाही, असेही पाटील म्हणाले.
Last Updated : May 13, 2020, 10:19 PM IST