पुणे -मागच्या महिन्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांच्यावर पिंपरी चिंचवड येथे शाहीफेक करण्यात आली होती. यानंतर देखील भीम अनुयायीकडून पाटील यांच्या विरोधात जोरदार आंदोलने केली जात होती. आज भीमा कोरेगांव येथील 205 शौर्य दिनाच्या ( Bhima Koregaon 205 Shaurya Din ) पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे भिमा कोरेगांव येथे न येता घरुनच अभिवादन केले आहे. यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना विचारलं असता ते म्हणाले की चंद्रकांत पाटील यांनी त्या प्रकरणी माफी मागितली आहे. रामदास आठवले या प्रकरणी यांनी अधिक बोलणे टाळले.
विजयस्तंभ अभिवादन -कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. शौर्यदिनाचे यंदाचे 205 वे वर्ष असून विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून हजारोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी कोरेगाव भीमामध्ये येथे दाखल झाले आहेत. त्याच दरम्यान आरपीआय (A) गटाचे संस्थापक अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विजयस्तंभास अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते.