पुणे- पुढील 72 तासात पुण्यासह राज्यातील इतर ठिकाणी विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागान व्यक्त केला आहे. हा पाऊस थोड्या वेळासाठी असेल. मात्र, मुसळधार असण्याची शक्यता पुणे वेधशाळेचे अधिकारी अनुपम कश्यप यांनी वर्तवली आहे.
पुढील 72 तासात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज - अनुपम कश्यप
पुण्यात आज, उद्या आणि परवा म्हणजे 12 तारखेपर्यंत दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 13 तारखेपासून 16 तारखेपर्यंत पाऊस कमी होईल. मात्र, त्यानंतर पुन्हा अशाच प्रकारचा वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-मुख्यमंत्री हे मैदानातून पळ काढलेले पैलवान - विजय वडेट्टीवार
पुण्यात आज, उद्या आणि परवा म्हणजे 12 तारखेपर्यंत दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज. 13 तारखेपासून 16 तारखेपर्यंत पाऊस कमी होईल. मात्र, त्यानंतर पुन्हा अशाच प्रकारचा वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता.
हा असा पाऊस पडण्याची कारण पुण्याच्या तापमानात दडली आहेत. पुण्यात आर्द्रता आणि तापमान जास्त आहे. दुपारी वाढलेल्या तापमानामुळे आर्द्रतेचं रुपांतर वेगाने ढगांमध्ये होऊन अचानक पाऊस पडत आहे. पुण्याच्या वर 15 किलोमीटरचे ढग असल्याची बातमी काल व्हायरल झाली होती. त्यावर बोलताना कश्यप म्हणाले, पुण्याच्या वरती किती किलोमीटरचे ढग आहेत याचा मुसळधार पावसाशी संबंध नाही. तर त्या ढगांपैकी किती ढग हे मुसळधार पाऊस देणारे आहेत, हे महत्त्वाचे आहे.