पुणे - जिल्ह्यातील उत्तर-पुणे भागात सलग चार दिवसांपासुन पावसाने चांगलीच बँटिंग सुरु ठेवली आहे. त्यामुळे चासकमान जलाशय ओव्हरफ्लो झाल्याने भीमानदी पात्रात १६ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. या नदीपात्रावरील चास, खरपुडी येथील पुलावरुन पाणी सुरु झाल्याने नागरिकांच्या दळणवळणासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
चासकमान जलाशय ओव्हरफ्लो, भीमानदी पात्रात १६ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु - heavy rain
पुणे जिल्ह्यातील उत्तर-पुणे भागात सलग चार दिवसांपासुन पावसाने चांगलीच बँटिंग सुरु ठेवली आहे. त्यामुळे चासकमान जलाशय ओव्हरफ्लो झाल्याने भीमानदी पात्रात १६ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
दुष्काळी परिस्थितीनंतर पहिल्यांदाच भीमा नदीला महापुर आल्यामुळे खरपुडी गावातील प्रत्येकजण हा पुर पाहायला नदीच्या काठावर आला आहे. भीमेचे हे रौद्ररुप पाहून प्रत्येकजण समाधान व्यक्त करत आहे. तर त्याचबरोबर अनेकांना अडचणींचा सामना देखील करावा लागत आहे.
दरम्यान, भीमानदी पात्रात १६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. आणखी पाऊसाचे प्रमाण वाढल्यास हा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे धरण प्रशासनाकडुन सांगण्यात आले आहे. म्हणून नागरिकांनी धोकादायक ठिकाणावरुन प्रवास करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.