महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे-नाशिक महामार्गावर विविध संघटनांचे चक्का जाम आंदोलन - पुणे-नाशिक महामार्गावर विविध संघटनांचे चक्का जाम आंदोलन

कृषी कायद्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आज देशभरातून चक्का जाम आंदोलन करत विविध संघटनांनी आणि शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर विविध संघटनांचे चक्का जाम आंदोलन
पुणे-नाशिक महामार्गावर विविध संघटनांचे चक्का जाम आंदोलन

By

Published : Feb 6, 2021, 5:27 PM IST

पुणे - कृषी कायद्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आज देशभरातून चक्का जाम आंदोलन करत विविध संघटनांनी आणि शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध संघटनांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरत एक तास चक्का जाम आंदोलन केले. यावेळी विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पुणे-नाशिक महामार्गावर विविध संघटनांचे चक्का जाम आंदोलन
पिंपरीत विविध संघटनांनी रोखला महामार्गकृषी कायद्यांविरोधात शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड वगळता देशभरात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या चक्का जामला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ठिकठिकाणी शेतकरी आणि विविध संघटनांनी रस्त्यावर येत आंदोलन केले आणि वाहतूक रोखली आहे.दिल्लीतील शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपिंपरी-चिंचवड शहरात देखील शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवत पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरत चक्क जाम आंदोलन केले. यावेळी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी दिल्लीमधील शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठाम उभे असल्याची भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.हेही वाचा -टोलनाका तोडफोड प्रकरणी राज ठाकरे यांना जामीन मंजूर

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details