महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चासकमान जलाशय ७५ टक्के भरला, भीमा नदी वाहतेय दुथडी भरून - पाऊस

भीमा नदीवर असणारा चासकमान जलाशय 75 टक्के भरला आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम राहिला तर लवकरच धरण 100 टक्के भरण्याची शक्यता आहे.

भीमा नदीवर असणारा चासकमान जलाशय 75 टक्के भरला आहे

By

Published : Jul 27, 2019, 7:07 PM IST


पुणे - सह्याद्री पर्वत रांगांमध्ये भीमाशंकर परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. भीमा नदीवर असणारा चासकमान जलाशय 75 टक्के भरला आहे. त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

भीमा नदीवर असणारा चासकमान जलाशय 75 टक्के भरला आहे
गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भिमा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. नदीपात्रात असणारे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुथडी भरून वाहत आहेत. भीमा नदीवरील सर्व बंधारे वापरण्यासाठी धोकादायक आहेत. या बंधाऱ्यांवर कोणीही वाहतूक व येणे-जाणे करू नये, त्यातुन धोका निर्माण होऊ शकतो. सध्या सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम राहिला तर लवकरच धरण 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी धोकादायक ठिकाणांहून प्रवास करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details