पुणे -एका सामान्य कुटुंबातील आयुर्वेद डॉक्टर चैत्राली कुलकर्णी हीचा चार वर्षांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. पण, अद्याप तिच्या मृत्यूची चौकशी होऊन तिच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी तिचे कुटुंबीय करत आहेत. सुशांतसिंह हा सेलेब्रेटी होता त्यामुळे त्याच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला आणि आम्ही सामान्य नागरिक आहोत, आमच्या प्रकरणाचा राजकीय फायदा नसल्याने हे प्रकरण सीबीआयकडे दिले जात नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
'सुशांतसिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे, पण आमचे काय..?' - पुणे क्राईम बातमी
चार वर्षापूर्वी एका आयुर्वेद डॉक्टर मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या घटनेचा तपास पोलिसांनी योग्य पद्धतीने न केल्याने सीआयडीकडे सोपवण्यात आला. मात्र, राजकीय दबावामुळे तेही तपास करत नसल्याचा आरोपी त्या मुलीच्या आई-वडिलांनी केला असून सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी केली आहे.
आधी पोलिसांनी आणि त्यांनतर सीआयडीकडे तपास गेल्यानंतरही चैत्रालीच्या मृत्यूचे गूढ उकललेले नाही. चैत्राली ज्या महाविद्यालयात ती शिकत होती. त्या कॉलेजच्या प्रमुखांचे महाराष्ट्रातील बड्या राजकीय दबावामुळे पोलीस या प्रकरणाची चौकशी करत नसल्याचा आरोप तिच्या आई वडिलांनी केला आहे. त्याचबरोबर सुशांतसिंह प्रमाणे चैत्रालीच्या मृत्यूची चौकशीही सीबीआय मार्फत करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा -पिंपरी-चिंचवडमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाचा कोयत्याने वार करून खून