पुणे- मी शिवसेना, काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षात काम केले आहे. आज हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करत आहेत, याचा आनंदच असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे.
तिन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करताहेत याचा आनंदच - छगन भुजबळ - समता दिन कार्यक्रमाला छगन भुजबळ उपस्थीत
मंत्रिमंडळाची शपथ आणि त्यानंतर विश्वासदर्शक ठराव संमत करून घेणे ही पुढची प्राथमिकता आहे. अजित दादांना परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. लवकरच पवारसाहेब त्यांना नवी जबाबदारी देतील याची खात्री आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.
महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुण्यतिथी निमित्ताने पुण्यातील फुलेवाडा येथे आयोजित समता दिन कार्यक्रमाला छगन भुजबळ उपस्थित होते. ते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचेही त्यांनी बोलताना सागितले आहे.
खातेवाटपाबाबत अद्याप कोणतीही निश्चिती झालेली नाही. आता मंत्रिमंडळाची शपथ आणि त्यानंतर विश्वासदर्शक ठराव संमत करून घेणे ही पुढची प्राथमिकता आहे. अजित दादांना परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. लवकरच पवारसाहेब त्यांना नवी जबाबदारी देतील याची खात्री आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.