महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

22 पाकिस्तानी निर्वासितांना भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र प्रदान - sindhi

केंद्र सरकारने दक्षिण आशिया खंडातील निर्वासित हिंदूंना नागरिकत्व प्रदान करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना बहाल केले आहेत. त्यामुळे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासंदर्भात सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी निर्वासितांना नागरिकत्व प्रदान केले आहे.

22 पाकिस्तानी निर्वासितांना भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले

By

Published : Jun 18, 2019, 11:29 PM IST

पुणे- गेल्या अनेक वर्षांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्य करणाऱ्या 22 पाकिस्तानी निर्वासितांना भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात या नागरिकांना भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्य करणाऱ्या 22 पाकिस्तानी निर्वासितांना भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात सिंधी समाज वास्तव्यास आहे. यापैकी हजारो नागरिक हे पाकिस्तानमधून भारतात वास्तव्यास आले आहेत. केंद्र सरकारने दक्षिण आशिया खंडातील निर्वासित हिंदूंना नागरिकत्व प्रदान करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना बहाल केले आहेत. त्यामुळे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासंदर्भात सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी निर्वासितांना नागरिकत्व प्रदान केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details