पुणे -दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा चिंतेचा विषय बनला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुक्त संचार करणे कठीण झाले आहे. यामुळे गेल्या चार महिन्यात आपण सर्वधर्मीय सण अतिशय साधेपणाने साजरे करीत आहोत. येणारी बकरी ईद सावध व साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रतिनिधींसह मुस्लीम बांधवांना केले होते.
यंदा ईद साध्या पद्धतीने साजरी करा; धर्मगुरू मौलाना शबी हसन काझमी यांचे आवाहन - बकरी ईद
शिया मुस्लीम समाजाच्या धर्मगुरू मौलाना शबी हसन काझमी यांनीही येणारी बकरी ईद साध्या पद्धतीने साजरा करावी व घरीच नमाज अदा करावी, असे आवाहन केले आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील मुस्लीम बांधवांनी बकरी ईद साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत शिया मुस्लीम समाजाच्या धर्मगुरू मौलाना शबी हसन काझमी यांनीही येणारी बकरी ईद साध्या पद्धतीने साजरा करावी व घरीच नमाज अदा करावी, असे आवाहन केले आहे. बकरी ईद म्हणजेच कुर्बानी. यंदा कुर्बानी देऊन शासनाने ईदविषयी नियम जाहीर केले आहे ते सर्वांनी मान्य करावे. रमजान ईद घरीच साजरा करण्यात आली त्याप्रमाणे आता बकरी ईदही घरीच साजरी करा, असे आवाहन मौलाना शबी हसन काझमी यांनी केले आहे.
आज गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून अनेक गोर-गरीब लोक अनेक संकटांना सामोरे जात आहेत. ईदच्या वेळेस कुर्बानी करताना अशा अनेक गोरगरीब लोकांचा विचार करावा व त्यांना मदत करावी. सध्या कोरोनाच्या महासंकटात सरकारने जो निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे हे मानून आपण सर्वांनी सरकारचा निर्णय मान्य केला पाहिजे व येणारी बकरी ईद ही साध्या पद्धतीने साजरा करावी. कुठेही कोणी एकत्र न येता दिलेले नियम मोडू नये, असेही यावेळी मौलाना शबी हसन काझमी यांनी सांगितले.