पुणे -दिपावली म्हणजेच दिव्यांच्या प्रकाशाने उजळण्याचा, नवचैत्यन्याचा सण आणि आज पासून या सणाची सुरुवात झाली. दिवाळीचा आजचा पहिला दिवस वसुबारस. हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.
दिपावली..! पुणे जिल्ह्यात गोधनाची पूजा करत वसुबारस साजरी - Pune Latest News
आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील गाडामालक संजय जयसिंग हिंगे यांच्या घरी आज वसुबारस साजरी करण्यात आली. शेतीत भरघोस उत्पादन व्हावे घरात आरोग्य सुख शांती लाभावी म्हणून ही पूजा केली जाते .

दिपावली आज वसुबारस साजरी
दिपावली आज वसुबारस साजरी
आजच्या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. सध्या सर्वत्र देशी गाईंची संख्या कमी झाली असून वसुबारस साजरी करण्यासाठी देशी गाई व वासरू उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी वसुबारस साजरी होत नाही. मात्र, आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील गाडामालक संजय जयसिंग हिंगे यांच्या घरी आज वसुबारस साजरी करण्यात आली. शेतीत भरघोस उत्पादन व्हावे घरात आरोग्य सुख शांती लाभावी म्हणून ही पूजा केली जाते .