महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 6, 2023, 7:18 PM IST

ETV Bharat / state

Pune Crime News : पुण्यात लेडीज टॉयलेटमध्ये बसवले सीसीटीव्ही, प्राचार्यांना केली बेदम मारहाण

पुण्यातील एका महाविद्यालयात लेडीज टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. तळेगावमधील डी. वाय. पाटील महाविद्यालयात ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विद्यार्थिनींच्या पालकांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. तर याबाबत काही संघटनांनी महाविद्यालयात जाऊन प्राचार्यांना जाब विचारला अन् त्यांना मारहाण केली. शाळा प्रशासनाने याबाबत काही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

Pune Crime
प्राचार्यांना केली बेदम मारहाण

डी. वाय. पाटील महाविद्यालयात टॉयलेटमध्ये बसवले सीसीटीव्ही

पुणे :पुणे शहराला शिक्षणाचे माहेरघर म्हटले जाते. तसेच शैक्षणिक राजधानी देखील म्हटले जाते. पुणे शहराबरोबरच जिल्ह्यात देखील मोठमोठ्या शैक्षणिक संस्था सुरू झाल्या असून मोठ्या प्रमाणावर देशभरातील तसेच विविध देशातील विद्यार्थी हे पुण्यात येत असतात. असे असताना पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील आंबी येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. महाविद्यालयात लेडीज टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले म्हणून, काही संघटनांनी महाविद्यालयात जाऊन प्राचार्यांना जाब विचारला अन् त्यांना मारहाण केली आहे.



प्राचार्यांची बदली करण्याची केली मागणी : लेडीज टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही लावण्यासोबतच विविध आरोप प्राचार्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. या प्राचार्यांची इथून तातडीने हकालपट्टी करावी अशी मागणीही पालकांकडून करण्यात येत आहे. बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांकडून प्राचार्यांना चोप देण्यात आला आहे. तसेच प्रार्थनेवरही आक्षेप घेतला आहे. हे दोन्ही आरोप करून प्राचार्यांना यांना मारहाण ही झाली असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा प्रकार लवकर थांबवा आणि प्राचार्यांची बदली करा अशी मागणी केली जात आहे.



टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही ? :पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून गुन्हे वाढत आहेत. त्यामध्ये डी. वाय. पाटील महाविद्यालयात असा गोंधळ उडताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दुसरीकडे मावळ तहसीलदारांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत. महाविद्यालय प्रशासनाने मात्र याबाबत मौन बाळगले आहे. त्यामुळे लेडीज टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही नेमके कोणत्या कारणासाठी बसविण्यात आले होते, हे अद्याप ही अस्पष्ट आहे. यावरुन बजरंग दलाचे कार्यकर्ते मात्र सक्रिय झाले आहेत. त्यांनी या सर्व प्रकरणाची तातडीने तपासणी झाली पाहिजे असे म्हटले आहे. शाळा प्रशासनाने मात्र या प्रकरणावर मौन बाळगणे पसंत केले आहे.

हेही वाचा -

  1. One Camera For City : गुन्हेगारांवर नजर ठेवणार २५०० कॅमेरे; 'एक कॅमेरा शहरासाठी' मोहिमेचा शुभारंभ
  2. Delhi Crime : व्यावसायिकाची बंदुकीच्या धाकावर लूट; मुख्यमंत्री केजरीवालांनी राज्यपालांचा मागितला राजीनामा
  3. Talk Back System : रेल्वे-लोकलमध्ये महिला असुरक्षित; लोकलमध्ये टॉक बॅक, पॅनीक बटन यंत्रणाही कागदारवरच

ABOUT THE AUTHOR

...view details