पुणे- कोंढवा परिसरात निर्माणाधीन इमारतीची संरक्षक भिंत कोसळून मलब्याखाली दबल्याने १५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये भिंत कोसळल्यामुळे पार्किंग मधील एक चारचाकी वाहन खाली पडल्याचे दिसत आहे.
पुणे दुर्घटना : संरक्षक भिंत कोसळल्याचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर - pune wall collapse
भिंत पडली त्या वेळेसचे चित्रण झालेले असून पार्किंगच्या गाड्या भिंत पडल्यानंतर खाली पडताना दिसून येत आहेत.
या घटनेने संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली आहे. शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संरक्षक भिंत खचून मजुरांच्या घरावर कोसळली. या दुर्घटनेत बिहार राज्यातून आलेल्या बांधकाम मजूरांचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर जागे झालेल्या प्रशासनाने आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये बिल्डर आणि सुपरवायझरचाही समावेश आहे. दोषींपैकी दोघांना अटकही करण्यात आली आहे.
या दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. भिंत पडली त्या वेळेसचे चित्रण झालेले असून पार्किंगच्या गाड्या भिंत पडल्यानंतर खाली पडताना दिसून येत आहेत.