महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CBI Raid : बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या घरी सीबीआयचे छापे

बँक घोटाळा ( YES Bank Scam ) आणि डीएचएफएल घोटाळा प्रकरणी ( DHFL Scam ) सीबीआयची ( CBI ) पुणे-मुंबई परिसरात ही छापेमारी सुरू आहे. याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी अविनाश भोसले ( Avinash Bhosale ) यांचेही नाव पुढे आले होते. शनिवारी (दि. 29 एप्रिल) सकाळी त्याच प्रकरणी भोसले यांच्या पुण्यातील बाणेर येथे असलेल्या निवासस्थानी सीबीआयचे अधिकारी पोहोचले आहेत. गेल्या 8 ते 9 तासांपासून त्या ठिकाणी असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

By

Published : Apr 30, 2022, 5:12 PM IST

v
v

पुणे -येथील बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या घरी शनिवारी (दि. 30 एप्रिल) सीबीआयने छापेमारी ( CBI Raid ) केली आहे. शुक्रवारपासून एका प्रकरणात सीबीआयने मुंबई आणि पुण्यात छापेमारी सुरू केली आहे.

या प्रकरणी सुरू आहे सीबीआयची छापेमारी -येस बँक घोटाळा ( YES Bank Scam ) आणि डीएचएफएल घोटाळा प्रकरणी ( DHFL Scam ) सीबीआयची ( CBI ) पुणे-मुंबई परिसरात ही छापेमारी सुरू आहे. याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी अविनाश भोसले ( Avinash Bhosale ) यांचेही नाव पुढे आले होते. शनिवारी (दि. 29 एप्रिल) सकाळी त्याच प्रकरणी भोसले यांच्या पुण्यातील बाणेर येथे असलेल्या निवासस्थानी सीबीआयचे अधिकारी पोहोचले आहेत. गेल्या 8 ते 9 तासांपासून त्या ठिकाणी असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

त्याचबरोबर शुक्रवारी याच प्रकरणी संजय छाब्रियालाही ( Sanjay Chhabria ) मुंबईमधून अटक करण्यात आली होती. अविनाश भोसले यांच्यावर मागच्या वर्षी ईडीनेही छापेमारी केली होती. ईडीने त्यावेळी त्यांची तब्बल 40.34 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती.

काय आहे प्रकरण -येस बँकेच्या 3 हजार 700 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आणि ईडीकडून तपास केला जात आहे. डीएचएफएल या फायनान्स कंपनीने येस बँकेकडून 3000 कोटी रुपयांचं कर्ज घेतले होते. ही कंपनी नंतर दिवाळखोरीत दाखवून हे कर्ज बुडवण्यात आले होते. या कर्जाचा मोठी हिस्सा हा रेडियस ग्रुपला देण्यात आला होता. येस बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी हे कनेक्शन उघड झाले असून सीबीआयने ही कारवाई केली आहे. काही महिन्यांपूर्वी संजय छाब्रिया यांच्या रेडियस या ग्रुपवर सीबीआयने छापेमारील केली होती. तेव्हापासूनच त्यांना अटक होणार, अशी चर्चा होती. संजय छाब्रिया यांनी बीकेसीमधील एक इमारत बांधली होती. त्यामध्ये अनेक राजकारण्याचं कनेक्शन असल्याचा सीबीआयला संशय आला आहे.

राजकारण्यांचे धाबे दणाणले - सीबीआयच्या या कारवाईमुळे आता अनेक राजकारण्यांचे धाबे दणाणले आहेत. आर्थिक अनियमितता आणि बेहिशेबी कर्जवाटप यामुळे रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर गेल्या वर्षी 5 मार्चपासून निर्बंध लागू केले होते. मात्र, त्यानंतर टप्याटप्याने ते शिथिल केले आणि येस बँकेचे व्यवहार पूर्ववत केले आहेत. हा घोटाळा उघड झाल्यानंतर येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक करण्यात आली होती. त्यांनंतर त्यांची पत्नी बिंदूसह दोन मुली रोशनी आणि राधा यांनाही अटक करण्यात आली होती. राणा कपूर बँकेचा सीईओ असताना सुमारे 30 हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले होते. यापैकी 20 हजार कोटी रुपयांची कर्ज बोगस असल्याचा दावा तपासयंत्रणेने केला आहे. त्याचबरोबर त्यांनी सुमारे 202.10 कोटी रुपयांची कर्ज काही दिवाळखोरी जाहीर केलेल्या कंपन्यांसाठी मंजूर केल्याचेही उघड झाले आहे.

हेही वाचा -CBI Raid in Pune and Mumbai : येस बँक आणि एचडीएफएल घोटाळा प्रकणी आठ ठिकाणी छापे

ABOUT THE AUTHOR

...view details