महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 28, 2021, 5:24 PM IST

ETV Bharat / state

कत्तलीसाठी नेण्यात येणारी जनावरे पकडली, 4 जणांवर गुन्हा दाखल

दौंड पोलिसांनी रात्रीच्या सुमारास दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत कत्तलीसाठी नेण्यात येणारी सुमारे ४२ जनावरे आणि त्यांची वाहतूक करणारी वाहने ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, जनावरांची वाहतूक करणारी चार वाहने ताब्यात घेतली आहेत, अशी माहिती दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.

कत्तलीसाठी नेण्यात येणारी जनावरे पकडली, 4 जणांवर गुन्हा दाखल
कत्तलीसाठी नेण्यात येणारी जनावरे पकडली, 4 जणांवर गुन्हा दाखल

दौंड -दौंड पोलिसांनी रात्रीच्या सुमारास दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत कत्तलीसाठी नेण्यात येणारी सुमारे ४२ जनावरे आणि त्यांची वाहतूक करणारी वाहने ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, जनावरांची वाहतूक करणारी चार वाहने ताब्यात घेतली आहेत, अशी माहिती दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.

रात्रीच्या सुमारास केली कारवाई

शनिवारी रात्री ११.३० ते २.३० वाजेच्यादरम्यान दौंड पोलिसांना शहरातील इदगाह मैदानाच्या समोर खाटीक गल्लीत कत्तलीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली २६ जनावरे मिळून आली. तसेच या जनावरांची वाहतूक करणारी ३ वाहने देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. याबाबत आबीद कुरेशी, आसीफ कुरेशी, वाजीद कुरेशी सर्व रा. दौंड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अन्य एका ठिकणी लिंगाळी रोड नजीक पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीसाठी असलेली १६ गोवंश जनावरे दौंड पोलिसांना आढळून आली, याबाबत पोलिसांनी अहमद आब्बास कुरेशी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा -मुंबईतील मालाड पूर्वेत व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चोरांना दिंडोशी पोलिसांनी केली अटक

ABOUT THE AUTHOR

...view details