पुणे - मावळ तालुक्यात पाण्याच्या शोधात विहरीत पडलेल्या उदमांजराची सुटका करण्यात आली आहे. मावळ वन-विभागाने क्रेनच्या मदतीने या मांजराची सुटका केली.
पुण्यात विहिरीत पडलेल्या दुर्मिळ उदमांजराची क्रेनच्या सहाय्याने सुटका - क्रेन
मावळ तालुक्यात पाण्याच्या शोधात विहरीत पडलेल्या उदमांजराची सुटका करण्यात आली आहे.
पुण्यात विहरीत पडलेल्या दुर्मिळ उदमांजराची क्रेनच्या सहाय्याने सुटका
पाण्याच्या शोधात आलेले उदमांजर विहिरीत पडले होते. त्यावेळी ते बचावासाठी तडफड करत होते. तेव्हा विहीर मालकाने याची माहिती मावळ वनविभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी क्रेनच्या सहाय्याने मांजराची सुटका केली. दुर्मिळ असणारा हा प्राणी आढळल्याने बघ्यांची गर्दी झाली होती.