पुणे (बारामती)- माहिती अधिकार कार्यकर्त्यांने माहिती अधिकारात समीर ज्ञानदेव वानखेडे या नावाने जात पडताळणी झाली आहे काय? (Sameer Wankhede Caste Verification) अशी विचारना जात पडताळणी प्रमाणपत्र समितीच्या मुंबई शहर कार्यालयाकडे केली होती. त्यावर कार्यालयाने सदर नावाची जात पडताळणी (Sameer Dnyandev Wankhede) झाली नसल्याची माहिती दिली आहे. (दि. १ नोव्हेंबर)रोजी बारामती तालुक्यातील करंजेपुल येथील नितीन संजय यादव यांनी ऑनलाइनद्वारे याबाबत माहितीची मागणी केली होती. त्यामध्ये ही बाब उघड झाली आहे.
जात पडताळणी प्रमाणपत्र संबंधित कार्यालयातून दिले गेले आहे का?
राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विधी विभागामार्फत मी गेल्या दीड महिन्यांपूर्वी एक ऑनलाइन आरटीआय जमा केला होता. त्या आरटीआयमध्ये मी अशी माहिती मागवली होती की, समीर ज्ञानदेव वानखेडे या नावाने त्यांच्याकडे कोणते जात पडताळणी प्रमाणपत्र संबंधित कार्यालयातून दिले गेले आहे का? जर दिले गेले असल्यास त्याच्या साक्षांकित प्रती मिळाव्यात अशी मागणी करणारा ऑनलाइन अर्ज जमा केला होता. त्यावर मला आज जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समिती मुंबई शहर कार्यालयाकडून ही धक्कादायक माहिती मिळाली असल्याचे नितीन यादव यांनी सांगितले.
प्रमाणपत्र सादर केले असेल तर ते कोणत्या नावाने?
संबंधित समितीमार्फत समीर ज्ञानदेव वानखेडे या नावाने कोणतीही जात पडताळणी प्रमाणपत्र तयार केलेले नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जर समीर ज्ञानदेव वानखेडे नावाची व्यक्ती राज्य किंवा केंद्र सरकारच्या सेवेत असेल तर त्या व्यक्तीने जात पडताळणी प्रमाणपत्र जमा केले आहे की नाही? हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. जर त्यांनी प्रमाणपत्र सादर केले असेल तर ते कोणत्या नावाने? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे असल्याचे यादव यांनी सांगितले आहे.
जात पडताळणी समितीकडून देण्यात आले