महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चाकूचा धाक दाखवून वृद्ध महिलेला मारहाण; 4 लाखांचा ऐवज लंपास - Pimpri-Chinchwad Crime News

हेमलता पाटील (वय 70) रा. निगडी प्राधिकरण, गायत्री हेरिटेज असे जखमी वृद्ध महिलेचे नाव आहे. हेमलता या घरात एकट्याच राहत असून त्याच परिसरात मुलगी आणि जावई राहतात. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास मागच्या गेटने आलेल्या चोरांनी हेमलता यांना धमकावत मारहाण केली आहे.

चाकूचा धाक दाखवून वृद्ध महिलेला मारहाण
चाकूचा धाक दाखवून वृद्ध महिलेला मारहाण

By

Published : Aug 11, 2020, 9:56 PM IST

पिंपरी-चिंचवड - अज्ञात चोरांनी वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवून बेदम मारहाण करत घरातील चार लाखांचे चांदी आणि सोन्याचे दागिने, रोख रक्कम 50 हजार असा एकूण चार लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. या घटनेप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात वृद्ध महिलेने फिर्याद दिली असून अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमलता पाटील (वय 70) रा. निगडी प्राधिकरण, गायत्री हेरिटेज असे जखमी वृद्ध महिलेचे नाव आहे. हेमलता या घरात एकट्याच राहत असून त्याच परिसरात मुलगी आणि जावई राहतात. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास मागच्या गेटने आलेल्या चोरांनी हेमलता यांना धमकावत मारहाण केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्चभ्रू निगडी प्राधिकरण परिसरातील गायत्री हेरिटेज येथे हेमलता पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एकट्याच राहतात. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास अज्ञात दोन चोरट्यांनी फ्लॅटच्या मागच्या गेटने घरात प्रवेश करत हेमलता यांना धमकावून घरातील सोने, चांदीचे दागिने आणि 50 हजार रोख रक्कम असा एकूण 4 लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला आहे.

या घटनेनंतर हमेलता यांनी मुलीला फोन करून संबंधित घटनेची माहिती दिली. तातडीने त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. घटनेविषयी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details