पुणे - लोणावळ्याच्या भुशी धरण परिसरात नियमांची पायमल्ली करून आलेल्या मुंबई येथील ४० पर्यटकांवर लोणावळा पोलिसांनी कारवाई केली आहे. आज रविवार असल्याने अनेक पर्यटक नियम झुगारून लोणावळा परिसरात पर्यटनासाठी आल्याचे समोर आले आहे. अशा पर्यटकांवर लोणावळा पोलिसांनी थेट कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. यात १० मोटरसायकल चालकांचाही समावेश असून त्यांनादेखील जिल्हाबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी दिली.
भुशी डॅम परिसरात नियमांची पायमल्ली, ४० पर्यटकांवर गुन्हे दाखल - पुणे जिल्ह्यातील धरणे
पुणे जिल्ह्यातील कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनाला बंदी घातली आहे. मात्र, काही हौशी पर्यटक नियमांची पायामल्ली करून पर्यटनास जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा पर्यटकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
लोणावळा पोलीस