पुणे :तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या घरात बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. आता त्याच शिक्षण विभागातील तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांवर पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सोलापूर विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी तुकाराम सुपे, त्यांची पत्नी, मुलगा तसंच सांगलीचे तत्कालीन शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानं शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
3 कोटी 59 लाखांची मालमत्ता सापडली : गेल्या वर्षी टीईटी प्रकरणातील मुख्य आरोपी तुकाराम सुपे, यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडं एकूण 3 कोटी 59 लाखांची मालमत्ता प्राथमिक तपासात आढळून आली आहे. त्यांनी ही मालमत्ता भ्रष्ट मार्गानं मिळवल्यामुळं त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला आहे.
82 लाखांहून अधिक रकमेचा गैरव्यवहार :याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितलं की, पुणे, सोलापूर तसंच सांगली येथील तीन वेगवेगळ्या अधिकार्यांवर गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध सोलापुरात एकूण 5 कोटी 85 लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच तत्कालीन शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांच्या पत्नीवर सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात 82 लाखांहून अधिक रकमेचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.