महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rickshaw Ban Protest : रिक्षा बंद आंदोलन प्रकरणी तीन पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे शहरात बेकायदेशीररित्या सुरू असलेली बाईक-टॅक्सी सेवा पूर्णपणे बंद (Rickshaw Ban Protest) करण्याची मागणी (Demand to stop bike taxi services) रिक्षा संघटनांकडून करण्यात आली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशन रिक्षा संघटनाचे केशव क्षीरसागर, बाबा कांबळे, आनंद अंकुश यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (case registered against three agitators) करण्यात आला आहे.

By

Published : Nov 29, 2022, 2:03 PM IST

Rickshaw Ban Protest
रिक्षा आंदोलनकरारी ईटिव्हीला माहिती देताना

पुणे :पुणे शहरात बेकायदेशीररित्या सुरू असलेली बाईक-टॅक्सी सेवा पूर्णपणे बंद (Rickshaw Ban Protest) करण्याची मागणी (Demand to stop bike taxi services) रिक्षा संघटनांकडून करण्यात आली आहे. याविरोधात काल शहरातील 12 रिक्षा संघटनांनी बेमूदत संप (rickshaw association strike Pune) पुकारला होता. शहरात दिवसभर काटेकोरपणे आणि शांततेत बंद पाळले गेले. तसेच, आरटीओ कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने रिक्षाचालकांनकडून आंदोलन (rickshaw ban protest in Pune) करण्यात आले. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशन रिक्षा संघटनाचे केशव क्षीरसागर, बाबा कांबळे, आनंद अंकुश यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (case registered against three agitators) करण्यात आला आहे.

रिक्षा आंदोलनकरारी ईटिव्हीला माहिती देताना

गुन्हा दाखल करण्यामागे आंदोलनाचे कारण :वाहतुकीस अडथळा, नियमभंग करून आंदोलन केल्याचा ठपका ठेवून आंदोलनात सहभागी झालेल्या रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींवर बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलआहे.

तर आंदोलन तीव्र करणार :काल आम्ही रिक्षा संघटनेने आंदोलन केले ते संपूर्णपणे अहिंसक पद्धतीने झाले आहे. दिवसभर शांततेने आंदोलन करूनही आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर दुचाकी टॅक्सी चालकांवर गुन्हा दाखल होत नाही. ते बंद देखील होत नाही. असे असताना आमच्यावरच उलट गुन्हे दाखल केले जात आहे. आमच्यावर असे बेकायदेशीर गुन्हे दाखल झाले तर आम्ही आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशारा यावेळी केशव शिरसागर आणि बाबा कांबळे यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details