पुणे(पिंपरी-चिंचवड) - शहरातील प्रसिद्ध गोल्डमॅन सनी वाघचौरे विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्याच्या पत्नीने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, शारीरिक, मानसिक छळ आणि गर्भपात केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी सानी नाना वाघचौरे (वय 31), आशा नाना वाघचौरे (वय 56, सासू), नाना वाघचौरे (वय- 60 सासरे), नीता गायकवाड (वय- 36 नणंद., सर्व रा.नेहरू नगर पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
हेही वाचा -खडसेंच्या पक्षप्रवेशानंतर महाविकास आघाडीत होणार बदल; तर भाजपाला फटका
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्डमॅन सनी वाघचौरेसह तक्रारदार यांची सासू, सासरे आणि नणंद यांनी संगनमत करून तक्रारदार यांच्या आई- वडिलांकडे गृहउपोयोगी वस्तूची मागणी करून, त्या वस्ती घेतल्या आहेत. त्याचबरोबर गोल्डमॅन सनीचे बाहेरील स्त्रियांशी शारीरिक संबंध असल्याचे तक्रारीमध्ये पत्नीने म्हटले आहे. कुटुंबातील सदस्यांनी तक्रारदाराला मारहाण आणि शिवीगाळ करून धमकी दिली आणि गर्भपाताचे औषध देऊन गर्भपात केला आहे.