पुणे - कोंढवा येथे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाल्या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये बिल्डर, साईट इंजिनियर, सुपरवायझर, कॉट्रॅक्टर यांचा समावेश आहे. या सर्वांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुणे दुर्घटना : १५ जणांच्या मृत्यूप्रकरणी 8 जणांना अटक, बिल्डरसह साईट इंजिनिअरचाही समावेश - collapse
मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच या घटनेची सखोल चौकशीचे आदेशही दिले आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून याप्रकरणी दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात आली आहे.
अल्कोन लँडमार्कस डेव्हल्पर्सचे बिल्डर जगदीशप्रसाद तिलकचंद अग्रवाल (वय ६४) , सचिन जगदीशप्रसाद अग्रवाल (वय ३४), राजेश जगदीशप्रसाद अग्रवाल (वय २७), विवेक सुनिल अग्रवाल (वय २१), विपूल सुनिल अग्रवाल (वय २१) तसेच कांचन बिल्डरचे पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्मीकांत गांधी या बिल्डरवर तसेच साईट इंजिनियर, सुपर वायझर, ठेकेदार यांच्यावर भारतीय दंड विधान ३०४ /३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच या घटनेची सखोल चौकशीचे आदेशही दिले आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून याप्रकरणी दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात आली आहे.