महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Chandrakant Patil: चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर 3 जणांवर गुन्हा दाखल

Chandrakant Patil: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर त्यांच्या आलेल्या प्रतिक्रियावर सोशल मीडियात सध्या प्रचंड प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक लोक त्यांना कमेंट करत आहेत. त्यातूनच सोशल माध्यमावर अर्वाचे भाषेत शिवीगाळ केली, म्हणून आता Kothrud Police Station कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये 3 विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chandrakant Patil
Chandrakant Patil

By

Published : Dec 14, 2022, 10:51 AM IST

पुणे: पुण्याचे पालकमंत्री राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विषयी सोशल माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी 3 जणावर कोथरूड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी किरण लांडे यांनी आरोपी विरोधात फिर्याद दिल्यानंतर पुण्यातील कोथरूड पोलीस स्थानकात विविध कलमान्वये 3 जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Kothrud Police Station सोशल माध्यमाच्या रिल्स या ॲपवर चंद्रकांत पाटील यांच्या विषयी अर्वाच भाषेत बोलून त्यांना शिवीगाळ करत धमकी दिल्या प्रकरणी कोथरूड गुन्हा दाखल झाला आहे.

कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल: चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर त्यांच्या आलेल्या प्रतिक्रियावर सोशल मीडियात सध्या प्रचंड प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक लोक त्यांना कमेंट करत आहेत. त्यातूनच सोशल माध्यमावर अर्वाचे भाषेत शिवीगाळ केली, म्हणून आता कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये 3 विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याचे पालकमंत्री महापुरुषाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्या विरोधात सध्या सोशल माध्यमावर मोठ्या प्रमाणात पाटील याना विरोध केला जात आहे.

11 पोलिसांना निलंबन करण्यात आले: चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणात चुकीच्या कलमान्वये गुन्हे दाखल केल्याची टीका झाली होती. पिंपरी चिंचवड प्रकरणात 11 पोलीस तसेच एका पत्रकारावरती गुन्हे दाखल करण्यात आले होते. आणि 11 पोलिसांना निलंबन करण्यात आले आहे. त्या विरोधामध्ये प्रचंड विरोधी भूमिका महाराष्ट्रामध्ये येत होता. कारण जे गुन्हे आहेत, ते चुकीच्या कलमाने दाखल केले आहेत, असा आरोप होत होता. त्यानंतर चंद्रकांत दादा पाटलाने एक पत्र काढून माझ्यासाठी हा विषय संपलेला आहे.

एका पत्रकाद्वारे जाहीर: या पोलिसांना निलंबित केले त्याने त्यांना कामावर घ्यावं, त्याचबरोबर त्या पत्रकारांना सुद्धा सोडण्यास माझे हरकत नाही. ज्याने माझ्यावर केली, त्यांनी सुद्धा माझ्याशी काही व्यक्तिगत दुश्मनी नाही. त्यांना सुद्धा माझे हरकत नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. तो वाद आता थांबतो ना थांबतो, तोच आता नवीन वाद हा निर्माण होण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वरती हिल्स बनवल्या म्हणून, आता कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये 3 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details