दौंडदौंड तालुक्यातील वरवंड येथे कासवाची शिकार करून, कासवाचे कापून तुकडे केल्याप्रकरणी दौंड वन विभागाने दोघांना अटक केली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कासवाच्या शिकरीबाबत दूरध्वनीवरून माहिती मिळाली. यानंतर आरोपींच्या घराजवळ कासवाचे डोके आणि कवच आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला. अशी माहिती दौंड वनविभागाने Daund Forest Department दिली आहे. या प्रकरणी बाप लेकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. turtle poaching
गुप्त माहिती मिळाली नाना धर्माजी सावंत व दादा नाना सावंत ( रा.वरवंड तालुका दौंड जिल्हा पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. दौंड तालुक्यातील वरवंड येथील वनपाल यांना भ्रमनध्वनीवरून गुप्त माहिती मिळाली होती. याबाबत दौंडच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांच्या सूचनेनुसार दौंड वनपरिक्षेत्रातील वरवंड येथील कानिफनाथ नगर येथील सावंत यांच्या घराजवळ वनपाल वरवंड व वनरक्षक वरवंड हे गेले. त्यावेळी त्यांना नाना धर्मा सावंत यांचे घराच्या परिसरामध्ये नाना धर्मा सावंत हे मांसाचे तुकडे करताना दिसून आले. वनपाल वरवंड व वनरक्षक वरवंड यांनी त्यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, शेजारीलच एका फिकट निळया घमेल्यामध्ये कासवाच्या तोंडाचा तुकडा दिसून आला. तसेच शेजारी भिंतीच्या पलीकडे कासवाचे कवच दिसून आले होते.