महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune Crime News : प्रेयसीच्या घरी जाऊन पतीला मारहाण करत पिस्तूल रोखले...पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल - प्रवीण जर्दे गुन्हा दाखल

कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्याचे प्रकार पुण्यात उडकीस आला आहे. पोलीस उपनिरीक्षकाने अनैतिक संबंध प्रस्थापित करून प्रेयसीच्या पतीलाच मारहाण करून पिस्तूल रोखत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

पुणे गुन्हे न्यूज
Pune Crime News

By

Published : Apr 9, 2023, 7:03 AM IST

पुणे: पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी मानली जाते. मात्र, शहरात दिवसेंदिवस गुन्ह्याचे प्रमाण वाढतच आहेत. आता तर, थेट पोलीस अधिकाऱ्यानेच पोलीस दलाच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल, असे कृत्य केले आहे. पत्नीसोबतचे अनैतिक संबध सोडून दे म्हणून सांगणाऱ्या, पतीला पोलिस उपनिरीक्षकाने मारहाण करून पिस्तूल रोखल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुण्यातील शास्त्रीनगर कोथरूड भागात पोलीस उपनिरीक्षकाने प्रेयसीच्या घरात जाऊन तिच्या नवऱ्याला मारहाण केली. पिस्तुल रोखत जीवे मारण्याचीधमकी दिली आहे. प्रवीण नागेश जर्दे असे घरात घुसून पतीला मारहाण करणाऱ्या आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. आरोपी प्रवीण जर्दे हा पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयातील कोर्टावर या ठिकाणी सध्या नियुक्तीला आहे. काही वर्षांपूर्वी त्याची नियुक्ती कोथरूड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या शास्त्रीनगर पोलीस चौकी या ठिकाणी होती. त्यावेळी मच्छिंद्र बबन हवले यांची पत्नीबरोबर सामाजिक सेवा करण्याच्या नावाखाली आरोपी जर्दे आणि तिचे सुत जुळवून तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले होते.

पोलीस दलात उडाली खळबळ -पत्नी सोबतचे अनैतिक संबंध सोडून देण्याच्या कारणावरून तक्रारदार मच्छिंद्र हवले यांनी आरोपी प्रवीण जर्दे याला सांगितले. त्यावर संतापलेल्या आरोपीने घरात घुसून पतीला मारहाण करत पिस्तूल रोखत जीवे मारण्याची धमकी दिली आहे .कायद्याचा रक्षक असलेला आरोपी पोलीस उपनिरीक्षक जर्देच्या या महाप्रतापाने शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अन्याय झाल्यानंतर नागरिकांनी तक्रार घेऊन जायचे असते तिथेच असा प्रकार घडला आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्याची पोलिसांवर जबाबदारीनागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी संरक्षण करण्याची जबाबदारी पोलीस विभागावर आहे. त्याच पोलीस विभागातील अधिकारी समाजातील नागरिकांना त्रास देत असेल, तर काय होणार? अशी नागिरक चिंता व्यक्त करत आहेत. पोलिसाने आरोपीसारखे कृत्य केल्याने पोलीस दलातसुद्धा आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नुकतेच शहरात कोयता गँगने धुमाकूळ घातला होता. तेव्हा पोलीस दलाकडून कारवाईला होणाऱ्या दिरंगाईबाबत जनतेमधून प्रश्न उपस्थित केले जात होते. कायदा व सुव्यवस्था रोखण्यासाठी पोलीस दलाला आणखी सक्रिय होण्याची गरज व्यक्त होत आहे.

हेही वाचा-Pistols Seller Arrested In Nanded: पिस्तुल विक्रीसाठी आले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले; गावठी कट्ट्यांसह तिघांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details