पुण्यात दहावीच्या पेपर सिक्योरिटी गार्डच्या मोबाईलमध्ये आढळल्याने खळबळ, सिक्योरिटी गार्डवर गुन्हा दाखल... पुणे : हा प्रकार पुण्यातील बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात घडला असून याबाबत मनीषा संतोष कांबळे यांच्या विरोधात पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी ( शिक्षण ) यांनी तक्रार दाखल केली आहे.
शाळांमध्ये जिल्हा परिषदेचे विविध पथक कार्यरत : याबाबत अधिक माहिती अशी की सध्या 10 वीच्या बोर्ड परिक्षा सुरू असून या परिक्षेच्या साठी जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान सुरू आहे. इ.10 वी परिक्षा 2 मार्च 2023 से 25 मार्च 2023 अशी होत आहे. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये जिल्हा परिषदेचे विविध पथक कार्यरत आहे. ते परीक्षेच्या ठिकाणी कामकाज पाहत आहे. काल 15 मार्च रोजी गणिताचे भाग 2 चा पेपर असताना पुण्यातील बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय येथे सिक्योरिटी गार्ड मनीषा कांबळे हा मोबाईल वर काहीतरी हालचाली करत असल्याचे पथकाला समजले.
प्रश्नपत्रिकेचा पानाचा फोटो आढळून आला :परीक्षा केंद्रावर मोबाईल बंदी असताना अशा पद्धतीने सिक्योरिटी गार्डकडून हालचाली होत आहेत. त्यामुळे पथकाकडून त्यांचे मोबाईल तपासला असता त्यातील गॅलरी मध्ये 13 तारखेचा गणित भाग 1 या विषयाच इंग्रजी माध्यमाचा प्रश्नपत्रिकेचा पानाचा फोटो आढळून आला आहे. विशेष म्हणजे या फोटो मध्ये एका अज्ञात विद्यार्थ्याच पेन हातात असलेला परीक्षा दालनामधील बाकडावरील फोटो आढल्याने सिक्योरिटी गार्ड उडवा उडविची उत्तरे देऊ लागली.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला : यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, बिबवेवाडी, पुणे येथे मनिषा संतोष कांबळे यांनी परिक्षा केंद्रावर मोबाईल वापरण्यास बंदी असतानाही 13 मार्च रोजीचा गणित भाग-1 या विषयाचा इंग्रजी माध्यमाचा एन-913 विषयकोड असलेला प्रश्नपत्रिकेचा पान क्र. 8 / एन-913 या पानाचा फोटो काढला. त्यांच्याविरूद्ध तसेच त्यादिवशी संबंधित ब्लॉकचे अज्ञात सुपरवायजर यांच्या विरूध्द महाराष्ट्र गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा सन 1982 (महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड आणि इतर निर्दिष्ठ परिक्षा कायदा 1982) चे कलम 7,8 अन्वये कायदेशीर फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा :Amruta Fadnavis News : अमृता फडणवीस यांना १ कोटींची ऑफर देणाऱ्या डिझायनरविरोधात गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण?