पुणे- बँकॉक येथे फिरण्यासाठी तसेच अन्य कारणांसाठी माहेरहून पैसे घेऊन ये, अशी मागणी करत पती, सासू, सासरे आणि नणंद यांनी मानसिक व शारीरिक छळ केला. याबाबत 28 वर्षीय विवाहित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या घटनेप्रकरणी विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन मयूर कटके (वय-33 वर्षे), लता केशव कटके (वय 56 वर्षे), केशव तुकाराम कटके (वय 60 वर्षे), कांचन प्रशांत घिसरे (वय 40 वर्षे) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करुन बँकॉक येथे फिरण्यासाठी, मोटार घेण्यासाठी, जिमच्या दुरुस्तीसाठी विवाहितेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. ओटी भरण्याच्या कार्यक्रमात रिटर्न गिफ्ट का दिले नाही, यावरून त्रास देत त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच विवाहितेला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी अरदवाड हे अधिक तपास करत आहेत.
परदेशवारीसाठी माहेरहून पैसे आण म्हणत विवाहितेचा छळ, सासरच्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल - Domestic Violence news
परदेशवारीला जाण्यासाठी, मोटार घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये, असे म्हणत शारिरीक, मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीविरोधात विवाहितेने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
निगडी पोलीस ठाणे