बारामती (पुणे)- अमरावतीच्या नगररचना विभागाचे सहसंचालक हनुमंत नाझिरकर, त्यांच्या पत्नी संगीता, मुलगी गीतांजली व इतर तिघांवर फळ विक्रेत्यांचा सुमारे 2 कोटी 90 लाख रुपयांचा खोटा दस्त करारनामा करत फसवणूक केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वाजली छोटू बागवान (रा. म्हाडा कॉलनी, बारामती) यांनी तक्रार दिली आहे.
बागवान यांच्या तक्रारीवरुन राहुल शिवाजी खोमणे, हनुमंत जगन्नाथ नाझिरकर, संगीता हनुमंत नाझिरकर, गीतांजली हनुमंत नाझिरकर, सतीश भिकाराम वायसे (सर्व रा.शिरवली, ता. बारामती), गुलाब देना धावडे (रा. सोमनथळी, ता. फलटण जि. सातारा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
करारनामा दाखवून केली फसवणूक
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत नाझिरकर यांच्या सांगण्यावरुन काळेधन हे शेती उत्पन्नाचे आहे. असे दाखवण्यासाठी राहुल खोमणे याने माझ्यासह इतर पाच जणांचे मुद्रांक कागदावर खोटे करारनामे केले आहेत. नाझिरकर व्यवहारापोटी सव्वालाख रुपये दिले होते. मात्र, आंबा व चिकू शिवाय कोणतीच फळे घेतली नसतानाही 74 लाख 40 रक्कम करारनाम्यात दाखवली गेली. इरफान युनूस बागवान याचा व्यवहार साडेतीन लाखांचा असताना 1 कोटी 83 लाख, मोहम्मद शरीफ बागवान यांची 29 लाख, असे 2२ कोटी 90 लाख रुपये करारनाम्यावर दाखवून फसवणूक केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा -माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली बैठक
हेही वाचा -श्वानाला वाचविण्याच्या प्रयत्नात मोटार कोसळली डेक्कन येथील भुयारी मार्गात