पिंपरी-चिंचवड (पुणे) -लहान मुलाचा अश्लील व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट करणाऱ्याविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसीम कमाली शेख (रा. आकुर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू ठुबल यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 एप्रिलला आरोपी वसीमने ओळखीच्या लहान मुलाचा अश्लील व्हिडीओ हा फेसबुकवर पोस्ट केला होता. हे प्रकरण चिंचवड पोलिसांपर्यंत गेले. त्यांनी वसीमविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक ठुबल यांनी तक्रार दिली आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ बनवणे, पाहणे आणि ते प्रसारित करणे हा कायद्याने गुन्हा आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. वसीम शेख याच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 चे कलम 67 (ब), बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 14 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेसबुकवर लहान मुलाचा अश्लील व्हिडीओ टाकणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल - पिंपरी-चिंचवड आयुक्तालय बातमी
लहान मुलाचा अश्लील व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट करणाऱ्याविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
चिंचवड पोलीस ठाणे