पुणे - जमीन व्यवहारात एका महिलेची फसवणूक करून, जिवे मारण्याची धमकी दिल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यासह दिगंबर गुलाब टाकळकर, राहुल वसंत टाकळकर, रामहरी शंकर दौंडकर यांच्याविरुद्ध सोमवारी शिरूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
जमीन व्यवहार फसवणूक प्रकरण : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बांदल यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल - जमीन व्यवहार
जमीन व्यवहारात महिलेची फसवणूक करून, जिवे मारण्याची धमकी दिल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यासह 3 जणांविरुद्ध सोमवारी शिरूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आशा किसन पाचर्णे (50) रा. तर्डोबाची वाडी, ता. शिरूर यांनी याबाबत तक्रार दिली आहे. जानेवारी 2008 मध्ये आशा पाचर्णे यांच्या पाच एकर जमिनीचा मंगलदास बांदल यांनी एक कोटी रूपयांना व्यवहार ठरविला होता. त्यासाठी 50 हजार रूपये रोख दिले होते. त्यानंतर खरेदी खताच्या वेळी 10 लाख रूपये आणि नंतर 12 लाख रुपयांचा चेक दिला. मात्र हा धनादेश बँकेत वठलाच नाही. व्यवहाराचे पैसेही दिले गेले नाहीत. नंतर जमिनीवर पाय ठेवू नये, म्हणून बांदल यांनी दमदाटी केली. त्यांच्या भीतीमूळे आम्ही आतापर्यंत गाव पुण्यात वास्तव्यास आहोत, असे या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार मंगलदास बांदल यांच्यासह 3 जणांविरुद्ध सोमवारी फसवणुकीचा गुन्हा शिरूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.