महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune Crime : सॉफ्टवेअर वापरून कार अनलॉक करायचे अन् चोरी करून परराज्यात विकायचे; टोळीला अटक - Cars stealing Gang using software in theft

मागील चार महिन्यात पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून स्विफ्ट आणि डिझायर कार चोरीला गेल्याचे एकूण पाच गुन्हे दाखल झाले होते. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी चोरीच्या गाड्या खरेदी करणाऱ्यांना चेन्नई येथून अटक करत त्यांच्याकडून स्विफ्ट आणि डिझायर कार अशा 4 कार जप्त केल्या. आरोपी सॉफ्टवेअरच्या मदतीने कार अनलॉन करून ती चोरायचे. पोलिसांनी आरोपींकडून तीस लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेत आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला.

Cars Stealing Gang Arrested
कार चोरणारी टोळी गजाआड

By

Published : Apr 21, 2023, 4:01 PM IST

चोरीच्या कारजप्तीविषयी सांगताना पोलीस अधीक्षक

पुणे:या प्रकरणी राजा कल्याण सुंदराम (रा. पावेदसराई मासई नगर तांबरम, चेन्नई), रविंद्रम गोपीनाथम (रा. नॉर्थ पोलीस क्वॉर्टर, वेल्लूर), यादवराज शक्तीवेल (रा. गांधी स्ट्रीट मुदीचूर तांबरम, चेन्नई) आणि आर. सुधाकरण (रा. बेंडलूरू, कांचीपुरम, चेन्नई) या आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 4 स्विफ्ट आणि डिझायर कार हस्तगत करण्यात आल्या.

पोलिसांकडून चार कार चोरांना अटक


आरोपींना चेन्नईतून अटक: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील चोरीला गेलेली वाहने ही अहमदनगर मार्गे संभाजीनगरकडे जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासातून निष्पन्न झाले. यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी चोरीच्या गाड्या कोणत्या राज्यात आहेत याबाबत बातमीदारामार्फत माहिती मिळविली. चोरी गेलेली वाहने तामिळनाडू राज्यातील चेन्नई शहरात असल्याची माहिती मिळाल्याने शिरूर विभागाचे तपास पथक चेन्नईला रवाना झाले. त्यांनी आरोपींना ताब्यात घेऊन चोरीला गेलेल्या गाड्या आणि मुद्देमाल जप्त केला.


चोरीच्या कार जप्त: यातील आरोपी आर. सुधाकरण याच्याकडे चौकशी केली असता त्याने मागील चार महिन्यात एकूण दहा गाड्या खरेदी केल्याचे सांगितले. त्याच्याकडून तीन चारचाकी वाहने हस्तगत केली आहेत. चेन्नई परिसरात विक्री केलेल्या चार कार (एकूण तीस लाख रूपये) त्यामध्ये दोन स्विफ्ट, दोन डिझायर कार हस्तगत करण्यात आल्या. तपासात शिरूर मधील तीन गुन्हे तसेच कोतवाली पोलीस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आला आहे.

चोरीसाठी सॉफ्टवेअरचा वापर: चोरी करणारे आरोपी हे तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील आंतरराज्यीय आरोपी आहेत. ते एकत्रित येऊन लॅपटॉपमधील सॉफ्टवेअरच्या साहय्याने कार अनलॉक करून ती चोरी करायचे. आरोपी सध्या शिरूर पोलिसांच्या ताब्यात आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने मागील महिन्यात ५० चोरीच्या मोटार सायकल हस्तगत करत 12 आरोपींना अटक करून ३९ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सराईत वाहन चोराला अटक:खडकी पोलिसांनी वाहन चोरीमध्ये सराईत असलेल्या गुन्हेगाराला 12 जून, 2020 रोजी अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून 14 लाख किंमत असलेली चोरीची सहा वाहने जप्त करण्यात आली होती. अंकल उर्फ सुशांत जॉन पंडित (वय 32) असे या सराईत चोरट्याचे नाव होते.

अशा पद्धतीने केली अटक: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंकल उर्फ सुशांत जॉन पंडित हा सराईत गुन्हेगार आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत त्याच्या नावावर 9 हुन अधिक गुन्हे दाखल आहेत. खडकी पोलीस स्टेशनच्या एका गुन्ह्यात मागील काही दिवसांपासून तो फरार होता. खडकी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी प्रताप गिरी व किरण घुटे यांना खबऱ्याकडून अंकल उर्फ सुशांत हा खडकी बाजार परिसरात आला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात वाहनचोरीचे नऊ गुन्हे केल्याची कबुली त्याने चौकशीदरम्यान दिली. यामध्ये टाटा सुमो, तवेरा, मारुती कार या चारचाकी वाहनासह काही दुचाकींचा समावेश आहे.

हेही वाचा:Maratha Reservation : मराठा समाजाला मागास घोषित करा; मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details