भविष्यातील गरजा लक्षात घेत विकासकामे मार्गी लावा, अजित पवारांच्या सूचना
शहरासह तालुक्यात सुरु असलेली विकासकामे करताना भविष्यातील गरजा लक्षात घेवून, प्राधान्याने विकासकामे मार्गी लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या. अजित पवार यांनी आज (शनिवार) बारामती येथे विविध ठिकाणी सुरू असणाऱ्या विकासकामांच्या प्रत्यक्ष ठिकाणी भेट देवून पाहणी केली.
बारामती (पुणे) - शहरासह तालुक्यात सुरु असलेली विकासकामे करताना भविष्यातील गरजा लक्षात घेवून, प्राधान्याने विकासकामे मार्गी लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या. अजित पवार यांनी आज (शनिवार) बारामती येथे विविध ठिकाणी सुरू असणाऱ्या विकासकामांच्या प्रत्यक्ष ठिकाणी भेट देवून पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओहोळ तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.