पुणे -हाय ब्लड प्रेशरची समस्या भारतासह जगभरात सामान्य झाली आहे. जागतिक स्तरावर १.१३ अब्ज लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. डब्ल्यूएचओच्या (WHO) मते, ही संख्या जगातील लोकसंख्येच्या दोन तृतीयांश आहे. हायपर टेन्शन ही एक अशी स्थिती आहे, जी सायलेंट किलर म्हणून ओळखली जाते. अनेकांना तर हा काय आजार आहे हेही माहिती नसते. 17 मे रोजी जगभरात वर्ल्ड हायपर टेन्शन डे साजरा ( World Hypertension Day ) केला जातो. वर्ल्ड हायपर टेन्शन लीगकडून याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या दिवशी विविध उपक्रम राबविले जातात. अनेकांना या आजाराबाबात माहिती नसते आणि मग ते वेळेवर यावर उपचार करु शकत नाही. अनेकांना तर हा काय आजार आहे, हेही माहिती नसते.
काय असते हायपर टेन्शन? :विचित्र लाईफस्टाईल, डाएट आणि स्ट्रेस यामुळे तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात. यातील एक समस्या म्हणजे हायपर टेन्शन. ज्याला हाय बीपी असेही म्हटले जाते. हायपर टेन्शन आता एक प्रमुख समस्या बनली आहे. यामुळे देशातील लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. या आजाराच्या सुरुवातीच्या लक्षणांची ओळख पटत नसल्याने हा आजार आणखी बळावतो. डॉक्टरांनुसार ही समस्या तणाव, खाण्या-पिण्यातील बदल, दारु, तंबाखू, किडनीशी निगडीत आजाराने किंवा फिजिकल अॅक्टिव्हिटी कमी झाल्याने होऊ शकते. उच्च रक्तदाबाचे सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढणे हे आहे. त्यामुळे आहारातील सोडियम कमी केल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारू शकते आणि रक्तदाब 5 ते 6 MM/HG ने कमी होऊ शकतो. सोडियम दररोज 2,300 मिलीग्राम पर्यंतच घ्यावे. यासाठी प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ कमी प्रमाणात खावेत आणि जेवणात वरून मीठ घेण्याऐवजी मसाले वापरावेत, असा सल्ला डॉक्टर देतात.