महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Video: महिला चालकाचे नियंत्रण सुटल्याने तीन चिमुकल्यांसह कार कालव्यात कोसळली अन्..

चासकमान डाव्या कालव्यावरून जात असताना महिला चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार कालव्यात कोसळली. पाण्याच्या प्रवाहात कार वाहून जात होती. मात्र, स्थानिक तरुणांनी सतर्कता दाखवत कारमधील दोन महिलांसह तीन चिमुकल्यांचे प्राण वाचवले.

car collapsed in canal
सातकरस्थळ येथे कार कालव्यात कोसळली

By

Published : Sep 13, 2020, 3:55 PM IST

Updated : Sep 13, 2020, 8:56 PM IST

राजगुरुनगर (पुणे) - राजगुरुनगरजवळील सातकरस्थळ येथून चासकमानच्या डाव्या कालव्यावरून जात असताना कार चालवणाऱ्या महिलेचे नियंत्रण सुटले. यामुळे कार कालव्यात पडली स्थानिक तरुणांनी केलेल्या मदतीमुळे कारमधील तीन चिमुकल्या मुलांसह दोन महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने कार पाण्याबरोबर वाहून गेली.

महिला चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार कालव्यात पडली

चासकमानच्या डाव्या कालव्यावरून जात असताना महिला चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार कालव्यात पडल्याची घटना घडली. त्या ठिकाणी असणाऱ्या आठ ते दहा तरुणांनी तातडीने कालव्यात उडी मारून कारमधील तीन चिमुकल्या मुलांसह दोन महिलांना बाहेर काढले. यावेळी "नशीब बलवत्तर म्हणून वाचलो", अशी भावना कार मधील महिलेने व्यक्त केली. तिने मदत करणाऱ्या स्थानिक तरुणांचे आभार मानले आहे.

हेही वाचा-राहुल-सोनिया परदेशात; संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला असणार गांधी कुटुंबीयांची अनुपस्थिती

चासकमानच्या डाव्या कालव्यातून पाचशे क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कालव्याच्या बाजूने जाताना महिलेचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कालव्याला कठडे नसल्याने कार पाण्यात पडली आणि वाहून गेली आहे.

Last Updated : Sep 13, 2020, 8:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details